ब्रेकींग न्यूज : राज्यात दोन दिवसांचा वीक एंड लॉकडाऊन

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता राज्यात शनिवारी आणि रविवारी असा दोन दिवसांचा Week End Lock Down लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून याबाबत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री नवाब मलीक यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतांना कडक उपाययोजना करण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांशी संवाद साधून त्यांचे लॉकडाऊनबाबत मत जाणून घेतले होते.

दरम्यान, आज दुपारी तीन वाजता मंत्रीमंडळाची विशेष बैठक झाली. ही बैठक ऑनलाईन या प्रकारात झाली. यात लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यात आली. यात महाराष्ट्रात आठवड्याच्या शेवटी दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा झाली. यानंतर राज्यात दर आठवड्याला दोन दिवसांचा Week End Lock Down लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

हा लॉकडाऊन Week End Lock Down शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू होऊन सोबवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आठवड्यातील प्रत्येक रात्री ही संचारबंदी असून दिवसा राज्यभरात कलम-१४४ लागू करण्यात आले आहेत. यामुळे पाच जणांपेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही. याशिवाय अन्य नियमावली देखील आखण्यात आली असून सरकारतर्फे याला लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलीक यांनी दिली.

संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

Protected Content