भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील साने गुरुजी चौकात पुढे शनी मंदिराचे बाजूला असलेल्या पानटपरीमध्ये गांधी पुण्यतिथीच्या दिवशी विना पास परमिट दारूची विक्री करणाऱ्यांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली. तर दुसरी कारवाई भुसावळ शहरातील सायली हॉटेल वरणगांव रोड गेटलगत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार दि. ३० जानेवारी रोजी आरोपी नितीन गंगाराम लोखंडे (वय ५१, रा. पोलीस नगर, साईबाबा मंदिरा जवळ,सोमनाथ नगर भुसावळ) येथील असून शहरातील साने गुरुजी चौकात पुढे शनी मंदिराचे बाजूला असलेल्या पानटपरीमध्ये दारूची विक्री आपल्या स्वतःचे फायद्यासाठी विना पास परमिट शिवाय प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल २ हजार ५५२ रुपये किंमतीचा देशी-विदेशी कब्जात बाळगतांना मिळून आला. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुरुन ४१/२०२१ कलम मु. प्रो.व्ही.६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोकॉ ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार अशांनी मिळून केली.
तसेच दुसरी कारवाईची फिर्याद पोकॉ अक्षय मोहन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ३० जानेवारी रोजी १०.०० वाजेच्या सुमारास आरोपी पिटर कलमेट अँथानी ( वय ३८ रा. वरणगांव रोड, १५ बंगला पहेलवान बाबा मंदिर जवळ भुसावळ) ,देविदास सोपान भारंबे ( वय ६० हॉटेल चालक राहणार त्रिमूर्ती नगर वरणगांव रोडवरील भुसावळ) शहरातील हॉटेल सायली वरणगांव रोड गेटलगत ७०० रुपये किंमतीची इम्पोरियाल ब्ल्यू कंपनीच्या १८० एमएल ५ बाटल्या १४० रुपये प्रमाणे, ५१० रुपये किंमतीची स्टरलीन रिझर्व कंपनीच्या १८० एमएल ३ बाटल्या १७० रुपये प्रमाणे, ४८० रुपये किंमतीची रुमानो कंपनीच्या १८० एमएल ३ बाटल्या १६० रुपये प्रमाणे, ४६० रुपये किंमतीची गोवा कंपनीच्या १८० एमएल ५ बाटल्या ९२ रुपये प्रमाणे, २०० रुपये किंमतीची एक चलनी नोट तिच्यावर उजव्या बाजूस पेनाने स्टार लिहिलेले २ हजार ३५० रुपये किंमतीची दारूची विक्री आपल्या स्वतःचे फायद्यासाठी विना पास परमिट शिवाय प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल २ हजार ५५२ रुपये किंमतीचा देशी-विदेशी कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणून गुरुन ४२/२०२१ महाराष्ट्र प्रोव्हिजन अँक्ट ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई प्रभारी अधिकारी अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, मंगेश गोटला, कृष्णा भोये, गणेश धुमाळ, स.फै.तसलीम पठाण व पोलीस कर्मचारी यांनी मिळून सदरची कारवाई केली.
तर सदरची संयुक्त कारवाई सायली हॉटेल मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ यांनी ४६ हजार ६५० रुपये किंमतीचा गैरकायदा विना पास परमिट वरील वर्णनाचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा किंमतीचा मुद्देमाल त्यांच्या कब्जात बाळगतांना मिळून आला आहे. त्या मुद्देमलास सील लावून सायली हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई करतांना अनेक राजकीय पुढाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोघ गुन्ह्यातील आरोपीना सीआरपीसी ४१(अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.