भुसावळ येथे हद्दपार असलेला सराईत गुन्हेगारास अटक

भुसावळ प्रतिनिधी । वेगवेगळ्या गुन्ह्यात असलेला ३० वर्षीय आरोपी एक वर्षाकरिता हद्दपार असतांना भुसावळ शहरात बेकायदेशीर रित्या फिरत असतांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील वाल्मीक नगर परिसरात एक वर्षाकरिता हद्दपार असलेला आरोपी अजय परशुराम पथरोड (वय-३०) रा. जामनेर रोड वाल्मीक नगर हा भुसावळ शहरात असल्याची माहिती भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, सपोनि मंगेश गोटाले, पो.ना रविंद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील पोकॉ कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, सचिन चौधरी आदींनी कारवाई करत आरोपी अजय पथरोड याला अटक केली असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग-५, गुरनं ८२६/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोटला करीत आहे.

Protected Content