महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ दारू विक्रीला परवानगी

बंगरुळु वृत्तसंस्था । कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महात्मा गांधीचा पुतळा म्हणजे काही पुजेची जागा नाही असं स्पष्ट केलं आहे. न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणामध्ये एम. जी. रोडवर (महात्मा गांधी मार्ग) दारुचं दुकान सुरु करण्यासाठी देण्यात आलेले परवाने रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

बेंगळुरुमधील वकील ए. वी. अमरनाथ यांनी न्यायालयामध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये जे दारुचं दुकान सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे तिथून अवघ्या ३० मीटर अंतरावर महात्मा गांधीचा पुतळा असल्याचे म्हटले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावत दारुविक्रेत्याला दिलासा दिला आहे.

Protected Content