एलआयसी विक्री म्हणजे मोदी सरकारचा लज्जास्पद प्रयत्न

नवी दिल्ली वृत्तसंस्था । “मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

केंद्र सरकारनं सार्वजनिक कंपन्यांतील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटाच सुरू केल्याचं दिसत आहे. एअर इंडियासह बँकिंग क्षेत्रातील काही बँकांचं खासगीकरण केलं जाणार असतानाच आता आणखी २६ सार्वजनिक कंपन्यांमधील भागीदारी सरकार विकणार आहे. यात एलआयसीतील काही हिस्सा विकणार असल्याचं समजतं. केंद्राच्या या निर्गुंतवणुकीच्या धोरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत सरकारनं आधीच काही सार्वजनिक कंपन्यातीली हिस्सेदारी विकली आहे. आता आणखी २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदींना लक्ष्य केलं आहे

Protected Content