बळीराजाचा नाद खुळा…कोथिंबिरीच्या उत्पन्नाने चेहर्‍यावर फुलले हसू !

नाशिक । एकीकडे शेतकरी अडचणीत सापडले असतांना नाशिक जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने फक्त ४१ दिवसांमध्ये चार एकरात पेरलेल्या कोथिंबिरीला १२ लाख ५१ हजारांचा भाव मिळाला आहे. या शेतकर्‍याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सध्या कोरोनाने अनेकांना जेरीस आणले आहे. यात शेतकर्‍यांचासही समावेश आहे. त्यातच यंदा पाऊस देखील हवा तसा न झाल्याने खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या हाताला काही लागले असे वाटत नाही. तथापि, या विपरीत परिस्थतीतही काही शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाल्याचे दिसून येत आहे. अशाच एका शेतकर्‍याची यशोगाथा सध्या सोशल मीडियात अनेकांच्या कौतुकाचा विषय बनली आहे.

सिन्नर तालुक्यातील (जि. नाशिक) येथील नांदूर शिंगोटे गावाच्या विनायक हेमाडे यांचा एक फोटो सध्या अनेकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. हेमाडे यांच्या फ़क़्त चार एकर कोथींबीर पिकाची विक्री थेट १२.५१ लाख रुपयांना झालिया आहे. त्यांना एकाचवेळी तेव्हढी कॅश रक्कम डोक्यावर घेऊन जातानाचा हा फोटो सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला आहे. हेमाडे यांनी ४ एकर जमिनीत ४५ किलो धने पेरले होते. यानंतर ४१ दिवसांनी काढणी करताना बाजारात चांगला भाव मिळत असल्याने व्यापारी शिवाजी दराडे यांची ही चार एकरमधील कोथींबीर १२ लाख ५१ हजार रुपयांना मागितली. हे पैसे डोक्यावर घेऊन घरी येणार्‍या हेमाडे यांचा फोटो कुणी तरी काढून तो सोशल मीडियात टाकला आणि अवघ्या काही तासांमध्ये याला तुफान प्रसिध्दी मिळाली आहे.

Protected Content