शिरसोली रोडवर दुचाकीस्वाराला मारहाण; चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गाडी चालविण्याच्या कारणावरून दुचाकीधारकाला अज्ञात चार जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शिरसोली रोडवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सैय्यद फरदीन अली साजीद अली सैय्यद (वय-२१) रा. भवानी पेठ जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. ५ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सैय्यद फरदीन हा दुचाकीवरून शिरसोली रोडवरील मोकळ्याजागेवर गाडी चालवत असतांना अनोळखी चार जणांनी गाडी चालविता येत नाही का ? असे बोलून त्याचा हात पकडून रस्त्याच्या साईडला घेतले. यात त्याला चौघांनी लोखंडी रॉड, हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. त्यात सैय्यद हा जखमी झाला. एमआयडीसी पोलीसात अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे. 

 

Protected Content