जळगाव जिल्हा ‘गुटखामुक्त जिल्हा’ करण्याचा संकल्प- आयजी प्रतापराव दिघावकर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून यांसदर्भात पोलीस अधिक्षकांना सुचना देण्यात आल्या असून लवकरच जळगाव जिल्ह्याला ‘गुटखामुक्त जिल्हा’ करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी अमळनेर, चाळीसगाव आणि भुसावळ विभागाची आढावा बैठक घेतली. आढावा बैठक घेतल्यानंतर ते पोलीस अधिक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांची उपस्थिती होती.

महिला दक्षता समिती नव्या गठीत होणार
जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षात समितीत महिला सदस्यांचा समावेश असतो. यातील काही महिलांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. अशा सदस्यांना कमी करून नव्याने सदस्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. यात शाळा, महाविद्यालय अशा ठिकाणाच्या मेहनती आणि हुशार महिलांचा समावेश करता येईल. किंवा जिल्ह्यातील महिला दक्षता समितीचे पुर्नगठण करण्यात लवकरच करण्यात येईल असेही आयजी दिघावकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात दत्तक योजना राबविणार
जिल्ह्यात गुन्हेगारी दत्तक योजना राबविली जाणार आहे. प्रत्येक 15 दिवसात गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्याची भेट घ्यावी, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे सूचित केल्याचे त्यांनी सांगितले. कापूस, केळी उत्पादक शेतकरी आणि बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा राखायला प्रभावी कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्ह्यात गुन्हे नियंत्रण चांगले असून करोनाच्या काळात गुन्हेगारी काहीशी थांबली. याबाबत जळगावकरांना धन्यवाद देऊ इच्छितो.सहा महिन्यांत सण उत्सवात सोशल डिस्टनसिंगचे पालन चांगले झाले. शिस्तीचे दर्शन घडले. यामुळे हा जळगाव पॅटर्न ओळखला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बॉर्डर बैठकांच्या माध्यमातून सीमेवरून होणारी गांजा, ड्रग्स, बंदुका, दरोडा, जबरी चोरी थांबवली जाणार आहे. यासाठी धुळे, जळगाव, खरगोन, बऱ्हाणपूरच्या अधीक्षकांची बैठक बोलावली जाणार असल्याचे आयजी दिघावकर यांनी सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/383703365964659/

Protected Content