Home धर्म-समाज भालोद येथे राष्ट्रीय ऊर्जा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात

भालोद येथे राष्ट्रीय ऊर्जा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात

0
53


यावल, प्रतिनिधी | राष्ट्रीय ऊर्जा बचत सप्ताहाच्या निमित्ताने तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय ऊर्जा बचत सप्ताहानिमित्त तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या ऊर्जा क्लबमार्फत घोषवाक्य निबंध, चित्रकला स्पर्धा घेऊन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करून बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. दरम्यान अनंत अग्निहोत्री यांनी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे वापर व त्याचे फायदे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समितीचे माजी सभापती भरत महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे महाऊर्जा विभागाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी अनंत अग्निहोत्री, प्रकल्प अधिकारी गांधेले, न्यु इंग्लीश स्कुल भालोद मुख्याध्यापक ए.एन. नेहते, पर्यवेक्षक डी.व्ही.चौधरी, उर्जा क्लब सदस्य ज्योत्स्ना राणे, एच.इ. चौधरी, पी.एस.वाघुळदे हे प्रामुख्याने
उपस्थित होते.


Protected Content

Play sound