विरावलीचे सैनिक महेंद्र पाटील यांचा सत्कार

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील विरावली येथील जवान महेंद्र पाटील पाळधी येथे आयोजित सेवारत, माजी सैनिक यांच्या परिवाराला सेवा देणाऱ्या डॉक्टर, प्राध्यापक, सैनिक यांच्या सत्कार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

 

जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेले अर्ध सैनिक दलाचे जवान यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा व निवृत्त जवान यांच्या विविध समस्या याबाबत चर्चासत्र तसेच सेवारत व निवृत्त सैनिक परिवाराकरीता शिक्षण, चिकित्सा सेवा दिलेल्या डॉक्टर,प्राध्यापक, सैनिक यांचा सत्कार काँनफेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्ससेस असोसिएशन व जळगाव जिल्हा निवृत्त अर्धसैनिक बलतर्फे पाळधी येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, काँनफेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्ससेस असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष-व्ही के शर्मा- हिमाचाल(DIG/Rtd)असोसिएशनचे वरीष्ठ पदाधिकारी देवेंद्र बक्षी-(दिल्ली), मनोज तेवतीया-(उत्तर प्रदेश) मोहन राव-(आंध्र प्रदेश), किरण पाल सिंग, एस. एस. संधू, मनबीर काटोच, दिलीप शार्दुल यांच्यासह धूळे/नंदुरबार जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शाहिद परिवाराचा सन्मान करण्यात आला तसेच देश सेवेसाठी तैनात सैनिक तसेच शहीद जवानांच्या पाल्याना विविध करिअर मार्गदर्शन आणि कोर्स व शिबिराला निःशुल्क व अत्यलप फि घेवून प्रवेश दिल्याबद्दल स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णीचे संस्थापक सचिव प्रा. संदीप पाटील(सोनवणे) तसेच माउली हॉस्पिटल रावेरचे संचालक डॉ. संदीप पाटील व डॉ. योगिता पाटील हे दोघे सैनिक आणि त्याचे परिवारला निशुल्क चिकित्सा सेवा विनामूल्य देत आहेत. या महान कार्यकरिता आणि सोबत वीरावलीचे सैनिक महेंद्र पाटील ह्यानी मागिल दोन वर्षांत सैनिक, शहीद सैनिक परिवारचे कारिता केलेल्या कार्याची ही यावेळी जिल्हा माजी सैनिक असोसिएशनद्वारा दखल घेतली गेली. सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा ही सत्कार दिल्लीचे असोसिएशन व आयोजक यानी केला याप्रसंगी विजय सपकाळे (निवृत्ती जवान बी एस एफ) असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष, बाळू पाटील उपअध्यक्ष आहेत. निवृत्त जवान रफिक शेख जिल्हा सचिव, रत्नाकर चौधरी उप सचिव हे उपस्थित होते. तर अल फैज पटेल याने सूत्रसंचालन केले.

Protected Content