जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करण्याबाबत निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्रासह देशात सातत्याने सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतीं कमी कराव्या, अशा मागणीसाठी पाचोरा तालुका शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना आज मंगळवारी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यावर गदा आली असून मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत, लोकांना संसार कसा चालवावा असा यक्ष प्रश्न पडला आहे.केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सतत पेट्रोल – डिझेल,  गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. यामुळे तेल, दाळी आदी वस्तूंच्या दरवाढीमुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाला जगावं की मरावं असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढीने शंभरी गाठली आहे.त्यामुळे दळणवळण मागली प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली. जनतेला स्वस्त व मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे  केंद्रसरकारचे कर्तव्य आहे.मात्र भाजपाप्रणीत मोदी सरकारची नीती हि भांडवलदारांची आहे. त्यांना सर्व सामान्य जनतेशी काही घेणे नाही. जनता मात्र महागाईमुळे होरपळून निघत आहे. शिवसेना हे कदापि सहन करत नाही.शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी असून मोदी सरकारने महागाई नियंत्रणात न आल्यास  मोदी शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, पेट्रोल डिझेल,गॅस,तेल व डाळींची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, महागाईला आळा घालावा अन्यथा पाचोरा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार राहाल आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, मुकुंद अण्णा बिलदीकर,प्रवीण ब्राह्मणे, हरिभाऊ पाटील,रवींद्र मराठे, टिल्लू आप्पा, विजय भोई यांचेसह शिवसेना महिला आघाडीच्या मंदाताई पाटील, सुनंदा महाजन,उर्मिला शेळके, किरण पाटील, रेखा राजपूत, स्मिता बारवकर यांची उपस्थिती होती.

भूमी अभिलेख कार्यालयात शिवसेनेची धडक

दरम्यान दरवाढ विरोधातील आंदोलना नंतर शिवसेनेचे मुकुंद अण्णा बिलदीकर यांचे नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भोये यांची भेट घेत शहर भूमापक स्वर्गीय कुलकर्णी यांचे रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने नाराजी व्यक्त करत तातडीने या पदाचा कार्यभार स्वतंत्र कर्मचाऱ्यांना द्यावा जनतेची कामे रेंगाळू देऊ नका अशी आग्रही मागणी केली.

अन्यथा आम्हाला  शिवसेनास्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला  तसेच पाचोर शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नावावर करण्यासंदर्भात सुरू असलेली प्रक्रिया संथ गतीने का सुरु आहे असा जाब अधीक्षक भोये यांना विचारला दरम्यान कोरूना परिस्थितीमुळे शासन आदेशामुळे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगत शासनाचा पुढील आदेश आल्यास तात्काळ मोजणीचे काम पूर्ण करु असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी मुकुंद अण्णा बिलदीकर, शहर प्रमुख किशोर बारावकर,प्रवीण ब्राह्मणे, नगरपालिका कर्मचारी प्रकाश पवार यांची उपस्थिती होती.

 

Protected Content