भारतापासून वेगळे व्हा ; शीख फॉर जस्टिस’चे मुख्यमंत्र्यांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने भारतापासून वेगळं व्हावं , यासाठी ‘शीख फॉर जस्टिस’ संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवलं आहे

दोन्ही राज्यांनी भारतीय संघ राज्य व्यवस्थेतून बाहेर पडून स्वातंत्र्य जाहीर करावं आणि संबंध तोडून टाकावेत अशी मागणी ‘शीख फॉर जस्टिस’ने केली होती.

आता त्यांनी त्यापुढे जात, एक वेबसाइट लाँच केली आहे. त्यांनी लोकांना दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्याचे आवाहन केले आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ ही स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करणारी देशविरोधी संघटना आहे. भारत सरकारने शीख फॉर जस्टिसवर बंदी घातली आहे.

सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणि प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार, या मध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांचे केंद्र सरकार बरोबर सख्य नाहीय. अनेक मुद्यांवर त्यांचे मतभेद आहेत. त्यामुळे फुटीरतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालची निवड केल्याचे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेतील सूत्राने सांगितले.

Protected Content