खामगाव सामान्य रूग्णालयात उद्यापासून लसीकरण

 

खामगाव, प्रतिनिधी । स्थानिक सामान्य रूग्णालयात कोव्हीशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला असून उद्या बुधवार १४ एप्रिल रोजी लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

सामान्य रूग्णालयात  सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक व शासनाची अनुमती असलेल्या संबंधित विभागातील व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.

 

Protected Content