२ हजारात नव्या फोनसह २ वर्षे कॉल , दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा ; जिओची नवी ऑफर !

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता जिओच्या नवीन ऑफरमधून ग्राहकांना २ वर्षांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज २ जीबी हाय स्पीड डेटाचा वापर करता येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी रिलायन्सकडून ही घोषणा करण्यात आली आहे. जिओ आणि नॉन जिओ अशा दोन्ही ग्राहकांसाठी जिओने प्लॅन्सची घोषणा केली आहे.

१९९९ रुपयांमध्ये नवा जिओ फोन, त्यासोबत २ वर्षांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि २ वर्षांसाठी दर महिन्याला २ जीबी डेटा म्हणजेच एकूण ४८ जीबी डेटा मिळणार आहे! पूर्ण २ वर्ष कोणतंही रिचार्ज करण्याची गरज नसेल.

ज्या ग्राहकांना १९९९ रुपयांचा प्लॅन घ्यायचा नसेल, त्यांच्यासाठी जिओचा १४९९ रुपयांचा प्लॅन देखील असून यामध्ये नवा जिओ फोन, १ वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १ वर्षासाठी दर महिन्याला २ जीबी हाय स्पीड डेटा म्हणजेच २४ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वर्षभर कोणतंही रिचार्ज करावं लागणार नाही.

७४९ रुपयांमध्ये एका वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, वर्षभरासाठी दर महिन्याला २ जीबी हाय स्पीड डेटा आणि वर्षभर कोणत्याही रिचार्जची गरज नाही.१ मार्चपासून नवे प्लान्स आणि नव्या ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असं रिलायन्सकडून जाहीर करण्यात आलं आहे.

Protected Content