भाजपा नाशिक महानगरातर्फे राज्यातील मोफत सेवा क्लिनिक ची मुहूर्तमेढ  

 

नाशिक ।संपूर्ण महाराष्ट्रात भाजपतर्फे मोफत सेवा क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. याची मुहूर्तमेढ नाशिक महानगरातर्फे नाशिक येथील उत्तमनगर येथे दराडे हॉस्पीटल येथे महापौर सतिष नाना कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भाजपा अध्यक्ष गिरीष पालवे यांच्या पुढाकाराने विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस , प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व वैद्यकिय आघाडी प्रभारी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रात मोफत वैद्यकिय सेवा क्लिनिक सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेंचाच भाग म्हणून भाजपा नाशिक महानगरातर्फे नाशिक येथील उत्तमनगर येथे दराडे हॉस्पीटल येथे महाराष्ट्रातील प्रथम मोफत सेवा क्लिनिकचे उद्घाटन महापौर सतिष नाना कुलकर्णी यांच्या हस्ते करून महाराष्ट्रातील मोफत सेवा क्लिनिकची मुहर्तमेढ नाशकात रोवली गेली.

भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. अजित गोपछडे, महापौर सतिष नाना कुलकर्णी, भाजपा शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील, उत्तर महाराष्ट्र संयोजक प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ. मंजुषा दराडे, वैद्यकीय आघाडी (होमियोपॅथी) संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. संजय धुर्जड, डॉ. जितेंद्र कोडीलकर, डॉ. सारंग दराडे, डॉ. सुनिता दराडे, डॉ. माधवी गायकवाड, सिडको मंडल-1 अध्यक्ष शिवाजी बरके, नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, नाशिक महानगर भाजपा व भाजपा प्रदेश वैद्यकिय आघाडीच्या माध्यमातून राबवलेल्या जात असलेल्या मोफत सेवा क्लिनिक केंद्र हे नाशिकच्या प्रत्येक वार्डात कार्यरत होतील व त्यासाठी वैद्यकिय आघाडीतर्फे या सेवा क्लिनिकना सेवा सुविधा पुरविण्यासाठी योग्यते नियोजन केले जाईल व पं.दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्नपुर्तीसाठी समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत आयोग्य सेवा पुरविण्यासाठी भाजपा वैद्यकिय आघाडी व्यापक प्रमाणावर कार्य करेल असे ते म्हणाले.

महापौर सतिष नाना कुलकर्णी यांनी उद्घाटनपर भाषणात वैद्यकिय आघाडीचे या उपक्रमाचे कौतूक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नाशिकच्या या मोफत सेवा क्लिनिकची सेवा हि राज्यात आदर्श सेवा ठरेल व हा आदर्श डोळयापुढे ठेवून संपुर्ण महाराष्ट्रात असे सेवा क्लिनिक उभारले जातील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश डॉ. अजित गोपछडे यांनी डॉ.प्रशांत पाटील यांना वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक म्हणून नियुक्ती पत्र दिले. त्याच प्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील विविध वैद्यकिय आघाडयांच्या संयोजकांची व सहसंयोजक नावांची घोषणा केली.

प्रास्ताविक डॉ.मंजुषा दराडे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी बरके यांनी केले. यशस्वीतेसाठी वैद्यकिय आघाडी संयोजक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. वैभव जोशी, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. संदिप सुतार, डॉ. ज्येाती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. आभा डॉ. विलास भदाणे यांनी मानले.   यावेळी कार्यक्रमास संतोष नेरे, विलास सानप, अर्चना दिंडोरकर, डॉ. चंचल साबळे, डॉ. संजय दाभाडकर, डॉ. उल्हास कुटे, शैलेश साळुंखे, विमल पोरजे, जान्हवी बिरारी, जयश्री धारणकर, मनिषा देवरे, रुपाली नेर, शोभा सोनवणे, सुवर्णा घोडके, वंदना सईद, जयश्री बारी, साहेबराव सावंत, उत्तम शिलेदार, बाळासाहेब घुगे, उत्तम काळे, करण शिंदे व परिसरातील नागरीक सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उपस्थित होते.

Protected Content