मडगाव बॉम्ब ब्लास्ट; सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता

 

पणजी – मडगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील ६ संशयित आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संशयाचा फायदा देऊन पुराव्याअभावी शनिवारी निर्दोष मुक्त केले आहे.

मडगावात अकरा वर्षांपूर्वी गाजलेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील ६ संशयित आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संशयाचा फायदा देऊन पुराव्याअभावी शनिवारी (दि.१९) निर्दोष मुक्त केले.  

विनय तळेकर, धनंजय अष्टेकर, प्रशांत अष्टेकर, विनायक पाटील, प्रशांत जुवेकर, दिलीप माणगांवकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. खंडपीठाचे विशेष न्यायमूर्ती पी.व्ही. सावईकर यांनी वरील निवाडा दिला आहे. बॉम्ब ब्लास्टची घटना मडगावातील ग्रेस चर्चजवळ दिवाळीच्या पूर्वसंध्येला १६ ऑक्टोबर २००९ रोजी झाली होती. या बॉम्ब ब्लास्टमध्ये मलगोंडा पाटील व योगेश नाईक हे दोघे घटनास्थळी मृत झाले होते.

सरकारच्या आदेशानुसार हे प्रकरण राष्ट्रीय तपास एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले. एनआयएने बॉम्ब ब्लास्टच्या प्रकरणाचा तपास करून वरील संशयित आरोपींना अटक करून मृत मालगोंडा पाटील व योगेश नाईक यांच्यासह ११ आरोपींविरूद्ध १७ मे २०१० मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील अन्य दोन संशयित अजून फरारी आहेत.

Protected Content