न्हावी येथे जुगार अड्ड्यावर धाड; आठ जणांवर कारवाई

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील न्हावी येथील बसस्थानकाजवळ फैजपूर पोलीसांनी धाड टाकून आठ जणांवर कारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना यावल तालुक्यातील न्हावी येथील बसस्थानकाजवळ काही जण जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली त्यानुसार पोउनि रोहिदास ठोंबर, स.फौ. अंबादास पाथरवट, विजय पाचपोळे, पोहेकॉ उमेश पाटील, सुरदास, पो.कॉ. वाहेद तडवी यांनी कारवाई केली. यावेळी न्हावी येथील एका गणेश मंडळाच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू असतांना आठ जणांवर कारवाई केली.

यात गिरीश शंकर लढे, लोकेश यशवंत चोपडे, हितेश यशवंत चोपडे, अनिल मुरलीधर चोपडे, उल्हास विलास चोपडे, प्रितेश नरेंद्र पाटील, प्रवीण काशीराम इंगळे, चेतन ललित झोपे यांचा समावेश आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे करीत आहे.

Protected Content