कोल्हापूर विद्यापीठ कुलगुरूपदाच्या शर्यतीत डॉ. पी. पी. माहुलीकर

कोल्हापूर । येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे प्र कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांचे नाव शॉर्ट लिस्टमध्ये आले आहे. आजच त्यांचा वाढदिवस असून याच दिवसाला त्यांना हे गिफ्ट मिळाले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाल १७ जूनला संपला आहे. त्यानंतर शोध समिती गठित केली. कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी १६९ अर्ज आले. यामध्ये राज्यासह दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातूनही काही प्राध्यापकांनी अर्ज केले होते. अर्जांची छाननी करून २८ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी व्हिडिओकाँन्फरन्सद्वारे मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यातून पाच जणांची निवड करण्यात येईल. या पाच जणांमधून कुलपती (राज्यपाल) एका व्यक्तीची कुलगुरू म्हणून निवड करतील.

दरम्यान, कुलगुरू पदासाठी निवड करण्यात आलेल्या शॉटर्र् लिस्टमध्ये जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांच्या नावाचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे आजच त्यांचा वाढदिवस असून आजच्याच दिवशी त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले आहे. तर, माहुलीकर यांची कुलगुरूपदी निवड व्हावी या शुभेच्छा त्यांना बहुतेकांनी दिल्या आहेत.

Protected Content