मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारतीय जनता पार्टीने नव्याने कार्यकरिणी जाहीर केली आहे. यात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर अशिष शेलार यांची मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यमंत्री मंडळात चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्याने ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यासाठी भाजपाने नवीन कार्यकारीणी जाहीर केली आहे. मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे अधीही होती. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांची जाबाबदारी कायम केली आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांचे नाव चर्चेत होते. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषद आमदारकी मिळाली आणि आता प्रदेशाध्यक्षपद मिळालं.
आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेता पुन्हा एकदा त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.