पी. जी. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नाम विस्तार वर्धापन दिनाच्या निमित्ताने खानदेशातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर कार्यक्रम नुकताच पार पडला.

हा कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.  एस.  झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राध्यापक संदीप पाटील, मु.  जे.  महाविद्यालयाच्या  स्वामी विवेकानंद कनिष्ठ विद्यालयाचे प्रा. गणेश सूर्यवंशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे सूक्ष्मजीव विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील हे  कार्यक्रमाचे समन्वयक होते. महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

प्राध्यापक सूर्यवंशी यांनी बहिणाबाई चौधरी यांचा  साहित्यिक जीवनाचा प्रवास संघर्ष, त्यांनी रचलेल्या ओव्या यांचा सहज भाषेत ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ.आर. एम. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

 

Protected Content