बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांकडून दोन लाखांचा धनादेश

Gold Medal

जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायनशास्त्र प्रशाळेत एम.एस्सी. इंडस्ट्रीयल केमिस्ट्री या विषयात मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनींस “कै. पांडुरंग विठ्ठल कुंभार गुरुजी सुर्वण पदक” प्रदान करण्यासाठी प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर व त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर हे १९९४ मध्ये केमिकल सायन्सेस प्रशाळेत रुजू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९५ मध्ये इंडस्ट्रीयल केमिस्ट्री हा विषय सुरु करण्यात आला आहे. या विषयाला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रा.माहुलीकर यांनी त्यांच्याकडे संशोधन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने प्रा.माहुलीकर यांचे वडील कै. पांडुरंग विठ्ठल कुंभार गुरुजी, मु.पो.माहुली, ता.खानापूर, जि.सांगली यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक जाहीर केले आहे. त्यासाठी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे प्रा.माहुलीकर यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.विवेक काटदरे, प्रभारी कुलसचिव, प्रा.बी.व्ही. पवार, प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, प्रा.दिपक दलाल, हेमंत नारखेडे, प्रा.निलेश पवार उपस्थित होते.

प्रा.माहुलीकर यांच्यासमवेत डॉ. पुरुषोत्तम देवांग, डॉ.निलेश पवार, डॉ.दिपक दलाल,डॉ.धनंजय मोरे, डॉ.क्षमा चव्हाण, डॉ.विद्या निकुंभ, डॉ.विश्वजित कुलकर्णी, डॉ.हेमंत नारखेडे, डॉ.उत्तम मोरे, डॉ. चेतन पाटील, डॉ.चांगदेव राऊत, डॉ.शैलेश भारंबे, डॉ.उमेश पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ.अविनाश बागले, डॉ.विलास महिरे, डॉ.प्रियंका शिसोदे, डॉ. रावसाहेब पाटील, डॉ.विकास शिंदे यांनी या सुर्वण पदकासाठी अर्थसहाय्य केले.

Protected Content