भरधाव बस कंटेनरवर धडकली; ३८ प्रवाशी जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर पुढे जात असलेल्या कंटेनरने अचानक वेग कमी गेल्याने मागणी येणारी बसने जोरदार धडक दिल्याची घटना अजिंठा चौकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात तब्बल ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव बस आगारातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव भुसावळ बस क्रमांक (एमएच २० बीएल ९४७) घेवून चालक देवेंद्र पाटील हे भुसावळकडे जाण्यास निघाले. याबसमध्ये विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशी व नोकरदार यांनी भरगच्च भरलेली होती. इच्छादेवी मार्गे भुसावळच्या दिशेने जात असतांना जिंठा चौकाजवळील ममता हॉस्पिटल जवळ पुढे जात असलेल्या कंटेनरने आपला वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगाने येणारी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ३८ प्रवाशी जखमी झाले आहे.

जखमी झालेले प्रवाशी याप्रमाणे, विजया उत्तम सुरवाडे(वय-४०, रा.नशिराबाद), रघुनाथ झुलाल पाटिल(वय-७०,चोपडा), लटकू विठ्ठल पाटिल(वय-६८,रा.पचोरा), चंद्रसिग बाबुलाल पाटिल(वय-३६), यामीनी पाटिल(वय-१६), योगिनी पाटिल(वय-१७), आरती माळी(वय-१६), शुभांगी नेमाडे(वय-१७), दिपाली अनिल माळी(वय-१७), हेमांगी सुभाष माळी(वय-१७), शुभांगी भावसार(वय-१८), शुभदा भावसार(वय-१७), रोहन कैलास सोनवणे(वय-२०), रतन सोनवणे(वय-३५, कवठळ), सरफराज शहा रज्जाक शहा(वय-५७,रा.नशिराबाद), अमीत चौधरी(वय-१६), जयेश अनिल झुंझारवाल(वय-२५,जळगाव), विजय रमेश इंगळे(वय-२०), नरेंद्र दिवाणसिंग पाटिल(वय-४५), पुजा मधुकर महाजन(वय-२०), नुतन पाटिल(वय-१७), रत्नदिप बोदडे(वय-२०), रेणुका संदिप भंगाळे (वय-१९), नुतन पाटिल(वय-१६), भावना फेगडे(वय-१६), बारकु विठ्ठल राजपुत(वय-६५), युसूफअली (वय-६५) सर्व रा. नशिराबाद, साक्षी राजेश गुंजाळ(वय-१७,रा.भुसावळ), भारती रविंद्र इंगळे (वय-४५,रा.नशिराबाद), धनश्री हरिष सैंदाणे(वय-२१,रा.भुसावळ), यांच्या व्यतिरीक्त देान गंभीर जखमी आणि इतर आठ प्रवासी खासगी दवाखान्यात रवाना झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content