धक्कादायक : पैश्यांसाठी जादूटोणा करून महिलेची हत्या !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील बेपत्ता झालेल्या ५१ वर्षीय विवाहितेला जादूटोणाच्या प्रकारातून तापी नदी पात्रात हत्या करून बुजविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

माया दिलीप फरसे (वय-५१) रा. क्रांती चौक, शिवाजी नगर जळगाव ह्या महिला बुधवार १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. जादूटोणातून हा प्रकार झाल्याचा आरोप मयत महिलेल्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात नातेवाईकांनी अमोल रतनसिंग दांडगे (वय-२७) आणि संतोष रामकृष्ण मुळीक (वय-२२) रा. शिवाजी नगर, जळगाव या दोन संशय व्यक्त केल्याने सोमवारी शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गभाळे, उपनिरीक्षक अरुण सोनार, कर्मचारी भास्कर ठाकरे, रतन गिते यांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेचा जादू टोण्याच्या प्रकारातून खून करून तिला तापी पात्राजवळ बुजण्यात आल्याचे सांगितले. याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल होवून पुरलेला मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.

Protected Content