जळगाव प्रतिनिधी । शहरातील भवानी पेठेतील कलर विक्रेत्यांच्या दुकानातील कामागाराकडूनच ग्राहकाला पाठविलेला माल परस्पर विक्री करून ३ लाख ३९ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या तरूणाविरूध्द शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमीद युसूफ कच्छी (वय-३८) रा. भावानी पेठ यांचे कलर कंपनी आणि कलर शॉप आहे. त्याचे भवानी पेठेत त्यांच्या मालकीचे गुजरात लाईन डेपो नावाचे दुकान आहे. दुकानावर शेख समीर शेख रा. उस्मानिया पार्क ममुराबाद रोड हा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कामाला आहे. ग्राहकाने मालाची ऑर्डर दिल्यानंतर मालाची रक्कम आपल्या बँकेच्या खात्यात जमा करत होते. दरम्यान दुकानदार हमीद कच्छी यांना याबद्दल संशय गेल्याने त्यांची चौकशी सुरू केली. त्यावर त्याने जळगाव याने २७ मे २०१९ ते २ जानेवारी २०२१ दरम्यान मिळेल त्यावेळी दुकानातील कलर परस्पर विक्री करून त्याच्या रिंगरोडवरील बँकेत ऑनलाईन पध्दतीने ३ लाख २३९ हजार १८५ रूपये स्वत:च्या फायदा करून घेवून दुकानदार हमीद कच्छी यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कच्छी यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख समीर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे करीत आहे.