
मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला परिक्षा देवून घरी जात असतांना एकाने फूस लावून नेल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यात एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वस्तव्याला आहे. मुलगी हीचे बारावीची परिक्षा सुरू आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तिचा शेवटचा पेपर देवून घरी जात असतांना गावातील करण मनोहर वाकोडे याने मुलगीला फूस लावून पळवून नेले आहे अशी तक्रार मुलीच्या वडीलांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी करण मनोहर वाकोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रावण जवरे करीत आहे.



