भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्री शक्ती समस्या समाधान शिबिर नुकतेच पार पडले. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटिल, तहसिलदार मुकेश हिवाळे, गट विकास अधिकारी आर. ओ. वाघ वाघ, नगरपालिका मुख्याधिकारी रविंद्र लांडे, कृषी अधिकारी बी. बी. बोर्डे व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावणा बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सावंत यांनी केली व उपस्थित महिलांना तहसीलदार मुकेश हिवाळे, बि. डी ओ वाघ मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटिल यांनी शासनाच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा व अधिकारी वर्गाने महीलांना सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लाऊन त्या ठिकाणी महिलांच्या समस्यांचे समाधान करण्यात आले सदर कार्यकमास विविध विभागाच्या १२ तक्रारी प्राप्त झालेल्या असुन त्या-त्या कार्यालयीन प्रमुखांनी सोडविण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. चिंचोरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासणि पर्यवेशीका श्रीमती सरिता शेजवळ, श्रीमती सुप्रिया सूर्यवंशी, संजय खामकर तसेच संरक्षण अधिकारी सुदर्शन पाटिल, प्रशांत कुंभारे, शहर सुपर वायझर गीता बारेला यांनी परिश्रम घेतले.