७/१२ वाचविण्यासाठी ८/१२ लढाई लढावी लागेल : प्रतिभाताई शिंदे (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी ।  ७/१२ वाचविण्यासाठी ८/१२ लढाई लढावी लागेल असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रविंद्र भिला पाटील, काँग्रेस शहर उपाध्यक्ष शाम तायडे, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड या तिन्ही संघटनाचे बंदला पूर्णपणे पाठींबा असल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील व शहरातील जवळ जवळ ३० संघटना व भाजपा वगळून सर्व पुरोगामी पक्षांची व महा विकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांची बैठक होऊन या बैठकीत एक मताने ७/१२ वाचविण्यासाठी ८/१२ लढाई लढावी असे ठरविण्यात आले. संयुक्त किसान संघर्ष समन्वय समितीच्या आदेशानुसार उद्या रस्ता रोकोसह बंद पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारला उद्याच्या बंद मधून इशारा देण्यात येणार आहे आता तरी जागे व्हावे अन्न दात्याच्या प्रश्नाकडे अधिक सजगपणे बघा, त्याच्या मालाला हमी भाव द्या, हमी भावासाठी कायदा बनवा, उद्योजक धार्जिणे धोरण न देशातील शेतकऱ्यांना वायदे व कंपन्यांना फायदे हे षडयंत्र हाणून पडणार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. राष्ट्रवादी महानगर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील अशी ग्वाही राष्ट्रवादीचे रवींद्र भिला पाटील यांनी देऊन बंद शांतेत पार पडण्याचे आवाहन केले.

Protected Content