पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भगवान महावीर जयंतीनिमित्त आज शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
आज ४ एप्रिल रोजी भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील गांधी चौक येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सदरची मिरवणूक गांधी चौक, सराफ बाजार, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, देशमुखवाडी मार्गे पुन्हा गांधी चौक येथील जैन मंदिरात आणण्यात आली.
या भव्य अशा मिरवणुकीत परिसरातील असंख्य पुरुष, महिला, युवती, युवकांसह समाज बांधवांनी मिरवणुकीत आवर्जून सहभाग नोंदवत भगवान महावीर यांना अभिवादन केले. एकंदरीतच संपूर्ण शहर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भक्तीमय झाल्याचे पहावयास मिळाले.