पहूर येथे भगवान जन्मकल्याण महोत्सवानिमित्त शोभायात्रा

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जैन श्रावक संघ व समाज बांधवांतर्फे जैन समाजाचे दैवत भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण महोत्सव भव्य शोभायात्रा काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण असून जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ. स. पू.५९९  चैत्र शुद्ध त्रयोदशीला, ” वैशाली ”  गणराज्यातील  ” कुंडग्राम ” येथे  ” इक्ष्वाकु  वंशात क्षत्रिय कुटुंबात झाला.

 

शेवटचे २४ वे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिन हा जन्म कल्याण महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे सजवलेल्या रथावरून  डी जे च्या सुमधुर संगीतात ‘भगवान महावीर’ यांच्या घोषणा देत मिरवणूक जैन स्थानक पासून ते संपूर्ण गावाच्या मुख्य रस्त्यांनी फिरवून सांगता सोभगचंद नगरात करण्यात आली.

 

यावेळी मिरवणुकीत पहूर येथील जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, सदस्य तसेच नवयुवक मंडळाचे सदस्य, महिला या सह सर्व समाजबांधव, तरुण, बालक मोठ्या संख्येने सहभागी होते.

यावेळी शोभायात्रा संपन्न झाली त्यानंतर महाप्रसाद (स्नेहभोजन) चा आस्वाद सर्व समाज बांधव व मान्यवरांनी घेतला.

Protected Content