विज वितरण कंपनीच्या कार्यालयात “लाईनमन दिवस” उत्साहात साजरा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अभियंता कार्यालयात मराठा सेवा संघातर्फे “लाईनमन दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विकास पाटील, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महापुरुष सन्मान समितीचे कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष किशोर पाटील, संघटक शरद मोरे, प्रसिद्धी प्रमुख नंदु शेलकर हे उपस्थित होते.

जनमित्र अर्थात लाईनमन हा विद्युत वितरण व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत विज पुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देणाऱ्या प्रकाश दुत म्हणजेच लाईनमन होय. केंद्र सरकारने यार्षापासुनच देशभरात ४ मार्च हा दिवस “लाईनमन दिवस” घोषित केला असल्याने येथील मराठा सेवा संघातर्फे पाचोरा शहरातील सुमारे ३० लाईनमन यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे मनोज पाटील, धर्मराज पाटील, प्रदिप देवरे, संदिप पाटील, सुशिल पाटील, शिवदास पाटील, पद्माकर पाटील, सोमनाथ अहिरे, अनिल पाटील, प्रविण जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार किशोर पाटील यांनी मानले.

Protected Content