Home धर्म-समाज रावेर मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

रावेर मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

0
251


maratha news

रावेर प्रतिनिधी । रावेर मराठा समाजातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रावेर येथील वधू वर सूचक परीचय मेळावा आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होते. रावेर समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने श्री. पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार अरुण पाटील यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार मुक्ताईनगर यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, यासारखे उपक्रम राबवाविणे हिताचे आहे व संबंध मराठा समाज बांधवांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसंगी त्यांनी केले यावेळी व्यासपीठावर रावेर मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित ,अतुल भोसले महापौर बह्मणपूर, श्रीराम पाटील उद्योजक, विनोद सोनवणे बिल्डर खामखेडा, गोपाल दर्जी, राम पवार, मराठा सेवा संघ जळगाव, अनिल पाटील, संभाजी ब्रिगेड जळगाव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील, योगीराज पाटील, सोपान पाटील, जितेंद्र पवार उद्योजक, कविता पवार लेखिका, रंजना पाटील, जि.प.सदसय पी.आर. पाटील, उपस्थितीत होते, तर यादवराव पाटील, वाय.व्ही. पाटील, आर.बी.महाजन, अंबादास महाजन, पोलिस पाटील विजय पाटील, रसलपूर गणेश महाजन सरपंच आटवाडा, चेतन पाटील, उटखेडा, अरुण कोकाटे, विलास ताठे, किशोर महाजन, नरेंद्र दोडके, विनोद पाटील, विलास कराळ, हदयेश पाटील. शेखर पाटील यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच विवाह समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी व इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अनमोल सहकार्य केले.


Protected Content

Play sound