मारवड व भोरटेक जि.प. शाळेच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मारवड व भोरटेक जि.प. शाळेच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन सोहळा दि. ९ डिसेंबर रोजी जि.प. सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते पार पडला.

मारवड येथे कै.मिठाराम पिरण साळुंखे यांच्या स्मरणार्थ भास्करराव पिरन साळुंखे यांनी तीन लाख रुपये खर्चून गावासाठी दशक्रिया विधी शेडचे निर्माण केले. त्याचा लोकार्पण सोहळा जि.प.सदस्या जयश्री पाटील व सरपंच उमेश साळुंखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भास्करराव साळुंखे यांच्या दातृत्वाचे मान्यवरांनी कौतुक केले. त्यानंतर मारवड येथील जि.प. मुलांमुलींच्या शाळेतील संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन सोहळा पार पडला. एकूण २५ लाख रुपये खर्चून सदर संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यावेळी जि.प.सदस्या जयश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भास्कर पिरन पाटील, लोकनियुक्त सरपंच उमेश रामकृष्ण साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, उपसरपंच बी डी पाटील, डॉ. विलास पाटील, उमाकांत साळुंखे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, रविंद्र साळुंखे, प्रकाश साळुंखे, बाबा सुर्वे, ग्रामसेवक नितीन पाटील, भाऊराव सोनवणे, भिकण सिद्धपुरे, प्रकाश पाटील, गजानन चौधरी, एल जी चौधरी, महेश पाटील, रुपेश साळुंखे, राजेंद्र सूर्यवंशी, बाबा सुर्वे, बंटी साळुंखे, प्रविण पाटील (उपसरपंच, गोवर्धन), नरेंद्र पाटील (गोवर्धन), लिपिक सुभाष पाटील, मुख्याध्यापक मोरे, व शिक्षक वृंद उपस्थित होते.

भोरटेक येथे ही पार पडले संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

तालुक्यातील भोरटेक येथे ही जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला. अंदाजे ११ लाख रुपये खर्चून सदर संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यावेळी अमोल पाटील, राजेंद्र पाटील, किशोर परदेशी, छबिलाल भील जि.प. शाळेचे वाघ गुरुजी, चव्हाण गुरुजी यांच्यासमवेत मारवडचे उपसरपंच बी डी पाटील, डॉ.विलास पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील, उमाकांत साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content