बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आर्यन बारसकारने तिसरा स्थान पटकाविला

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबईत नुकतीच झालेल्या इंटरनॅशनल आयसीएन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अमळनेर येथील आर्यन बारसकर या तरुणाने तिसरा स्थान पटकाविला आहे. या स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळवणारा तो तालुक्यातून पहिला ठरला आहे.

मुंबई येथे नुकतीच २७ मे २०२३ रोजी इंटरनॅशनल आयसीएन बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अमळनेर शहरातील राजमुद्रा फाऊंडेशन संचलित अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कु.आर्यन बारसकर या तरुणाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याला ३ ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून अश्या प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवणारा तो अमळनेर शहरातील प्रथम बॉडीबिल्डर ठरला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील , अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे , सिद्धांत पाटील , मयूर बारसकर , विठ्ठल पाटील यांच्यासह अनेकांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Protected Content