मुंबई प्रतिनिधी । बुट पॉलिश करून जीवनात प्रचंड संघर्ष करणारा पंजाबमधल्या भटिंडाचा प्रतिभाशाली गायक सनी हिंदुस्तानी याने इंडियन आयडॉलच्या अकराव्या सीझनमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
इंडियन आयडॉलचा अकरावा सीझन सुरू झाल्यापासूनच सनी हिंदुस्तानीला अलोट लोकप्रियता मिळाली होती. स्पर्धेच्या विविध फेर्यांमधील त्याचा परफॉर्मन्स पाहून त्याची तुलना दिग्गज गायक नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत करण्यात आली होती. रविवारी रात्री इंडियन आयडॉल-११ चा ग्रँड फिनाले झाला. यात सनी हिंदुस्तानीने बाजी मारून विजेतेपद पटकावले. दरम्यान, इतर स्पर्धकांवर मात करून त्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पाठींबा देऊन त्याचा विजय सुकर केला. त्याला २५ लाख रूपयांचे पारितोषीक मिळाले आहे. तसेच या माध्यमातून आता सनीला चित्रपटातील कारकिर्दीची संधीदेखील उपलब्ध होणार आहे.