मुख्यमंत्र्यांवर कंगनाचा पुन्हा ट्विटहल्ल्ला

मुंबई : वृत्तसंस्था / अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वादावर अजूनही शमला नसल्याचंच दिसून येत आहे. कंगना रणौतनं आणखी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मुव्ही माफिया आणि सुशांतची हत्या करणाऱ्याना उघड पाडलं हाच माझा गुन्हा आहे,” असं म्हणत कंगनानं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कंगना रणौतनं ९ सप्टेंबर रोजी मुंबईत आली होती. त्यामुळे शिवसेना आणि तिच्यातील वाद जोरात उसळून आला होता. त्यानंतर आज कंगना मुंबई सोडून मनालीतील आपल्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हीच मूळ समस्या आहे की, मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे हत्यारे आणि त्यांचं ड्रग्ज रॅकेट यांचा पर्दाफाश केला. ज्यांच्यासोबत त्यांचा प्रिय मुलगा आदित्य ठाकरे फिरत असतो. हाच माझा मोठा गुन्हा आहे, त्यामुळे ते मला मॅनेज करू पाहत आहेत. पण, बघू कोण कुणाला फिक्स करत ते,” असा इशाराही कंगनानं उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Protected Content