बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील ‘तो’ वादग्रस्त पाठ अभ्यासक्रमातून कमी !

पुणे (वृत्तसंस्था) बालभारतीचे इयत्ता ८ वीचे मराठीचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या पाठात चूक असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर अनेकांनी याबाबत टीका केली होती. या टीकेनंतर यंदा आठवीच्या अभ्यासक्रमातून ते कमी करण्यात आले आहे.

 

 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेली आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या पाठात “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले, अशी चूक झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. या पाठ्यपुस्तकातील दोन ते सहा या क्रमांकाचे पाठ कमी केला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षेत या पाठातील कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. या पाठावर कोणतीही परीक्षा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत यंदाचा पाठ अभ्यासासाठी कमी केला आहे.

Protected Content