जळगावात भरधाव वेगाने येणाऱ्या ‘त्या’ कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव प्रतिनिधी । नेरी ते जळगाव शहर व शहरातून अजिंठा चौफुली ते रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनर चालकाने अनेक वाहने उडवल्याचा थरारक प्रकार रविवारी दुपारी घडला. कंटेनर जळगावात दाखल झाल्यानंतर काशिनाथ हॉटेलजवळ एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाले आहे. याप्रकरणी कंटेनरसह चालकास एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, मलकापूरमध्ये कंटेनर (एमएच २३ एयू ४४३३) हा केमिकल खाली करून मुंबईकडे जात होता. यावेळी हा कंटेनर चालक भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय-३९) रा. कर्हे वडगाव ता. आष्टी जि. बीड याच्या ताब्यात होता. मद्यधुंदावस्थेत चालक खांडवेचे कंटेनरवरील ताबा सुटल्याने नेरी येथे काही वाहनांना उडवले. काही लोक कंटेनरच्या मागावर असल्याने भीतीने कंटेनर चालकाने कंटेनर भरधाव वेगाने पळवला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेला कंटेनरी दाखल झाला. यावेळी हॉटेल प्रसिडेन्टमध्ये काम करणारे राजू गोविंदा चव्हाण (वय-२८) शहरातील काशिनाथ चौफुलीवरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीसी ८१४६) ने घरी जात असतांना पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरच्या धकडेत दुचाकीवरून खाली पडले. त्यात राजू चव्हाण यांना मुका मार लागला असून पायाला दुखापत झाली. याप्रकरणी राजू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालक भाऊसाहेब खांडवे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content