महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला ; राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन 30 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. परंतू यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्या आहेत.

 

 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असे नमूद केले होते. त्यानुसार लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढविला असला तरी त्यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ या वेळेत सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांसह खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे. परंतू इनडोर स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच सामुहिक (ग्रुप) कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य आहे. सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावी लागणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असे राज्य सरकारने सांगितले आहे.

Protected Content