बायोमेट्रिक पद्धत वापरण्याची अट शिथिल करा : अनिल अडकमोल (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी  । देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी युद्ध पातळीवर लाखो रुपये खर्च करत आहे तर दुसऱ्या बाजूला गोरगरिबांच्या जीवाशी खेळत असल्याचा थेट आरोप करत बायोमेट्रिक पद्धत वापरण्याची अट शिथिल करण्याची मागणी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) जिल्हाध्यक्ष अनिल  अडकमोल  यांनी  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन केली.

रेशन दुकानातून लाभार्थी २ रुपयाच्या धान्य देण्यासाठी  शासन बायोमेट्रिक पद्धतीचा सक्ती  करीत आहे.  शासनाने हि अट शिथिल करावी अशी मागणी करत बायोमेट्रिक पद्धतीचा वापर वाढला तर  कोरोनाचा वाढता संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करत जिल्हाध्यक्ष श्री. अडकमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत  चर्चा करून  ही अट तात्पुरती स्वरुपात शिथिल करण्याची मागणी केली आहे. ज्या प्रमाणे शासकीय व निम शासकीय कार्यालयात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बायोमेट्रिकची तात्पुरती  अट शिथिल करण्यात आली आहे , त्याचप्रमाणे शासनाने गरीब लाभार्थ्यांना  रेशनचे वाटप करतांना  बायोमेट्रिक पद्धतीची  सक्ती  करण्यात येवू नये जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/528172928341833

 

Protected Content