बडतर्फे कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; मृतदेह आणला थेट महापालिकेत

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेतील तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजेनिबांळ्कर यांनी कारवाई केली असता बांधकाम विभागातील कर्मचारी विष्णू चावदस बागडे (वय ५२) हे बडतर्फे झाले होते. पाठपुरावा करून देखील कामावर घेतले जात नसल्याच्या ते तणावात होते. या तणावातच आज त्यांचा हदविकाराच्या झटक्याने दुपारी निधन झाले. त्यांच्या मृत्यू महापालिकेच्या दुर्लक्ष कारभारामुळे झाल्याचा संताप नातेवाईंनी व्यक्त करत त्यांचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन केले. मुलाला अनुकंपात लावण्याचे आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा नातेवाईंकांनी घेतला होता.

जळगाव महापालिकेत तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर असतांना सह्याजीराव व वेळेत कामावर आलेले नसलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांना बडतर्फे केले होते. दरम्यान तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी ३० बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून सुध्दा सेवेत घेण्याची प्रक्रिया महापालिका घेत नसल्याने अनेक कर्मचारी न्यायालयात गेले होते. यामध्ये विष्णू चावदस बागडे हे देखील न्यायालयात गेले होते. वारंवार दाद मागूनसुध्दा त्यांना कामावर हजर केले जात नव्हते. याकरणांनी बागडे हे तीन वर्षापासून तणावात होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली होती. त्यात आज दुपारी १२ वाजता हदविकाराचा झटका येवून त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईंकांनी महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त करत बागडे यांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता थेट महापालिकेच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन केले. यावेळी महापालिकेच्या भोंगळ कारभारचा निषेध करत मृत बागडेंच्या मुलाला त्याच्या जागी अनुकंपात नोकरीत समावेश करून घेण्याची मागणी केली. याबाबत आयुक्त सतिश कुलकर्णी यांची नातेवाईंकांनी भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी म्हणाले, की बडतर्फे कर्मचाऱयांचा न्यायालयात केस सुरू आहे. याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. त्यानुसार पुढील प्रक्रिया करू असे आश्‍वासन मृत बागडे यांचा नातेवाईंकांना आयुाक्तांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांनी बागडेंचा मृतदेह महापालिकेतून नेऊन अंत्यसंस्कार केले

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/359194758492029/

Protected Content