बँक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राध्यान्याने द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे स्थानिकच नव्हे तर जागतिक स्तरावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सर्व फ्रन्टलाइन वरची कोरोनाच्या भीषण परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची अविरत सेवा केली. सर्वच फ्रन्टलाइन वॉरियर्सला वयाची अट न घालता, 60 वर्षावरील सर्वांना तसेच 45 वर्षांवरील रुग्णांना शासन प्राधान्य देऊन कोरोनाची लस देत आहे. मात्र गेल्यावर्षभरापासून कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत बँकेचे अधिकारी व कर्मचारी हे रुजू होते व त्यांनी केलेल्या कार्य देखील अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने मंजुरी दिली होती. अशा या सर्व बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वयाची अट न घालता त्यांना तातडीने अत्यावश्यक सेवा म्हणून कोरोनाची लस प्राध्यान्याने देण्यात यावी अशी मागणी ॲड.रवींद्र भैय्या यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

Protected Content