लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांकडून शिवसेना घेणार प्रतिज्ञापत्र !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या बंडाने हादरलेल्या उध्दव ठाकरे यांनी पक्षाचे उर्वरित आमदार, खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि सर्व पदाधिकार्‍यांकडून आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांना आकस्मीकपणे मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शिवसेनेतील उर्वरित आमदारांमधून देखील काही जण हे त्यांच्या गटात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच या गटाला केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळण्याचे संकेत असल्याने पक्षाच्या खासदारांचा मोठा गट देखील त्यांच्याकडे जाऊ शकतो. तर आगामी निवडणुकांचा विचार केला असता, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधींमध्येही फाटाफूट होण्याचा धोका आहे. यामुळे उर्वरित लोकप्रतिनिधी आणि सोबत पक्षाचुे पदाधिकारी वाचविण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी एक नवा मार्ग निवडण्यात येणार असल्याचे वृत्त टिव्ही नाईन या वाहिनीने दिलेले आहे.

यानुसार, शिवसेनेतर्फे आपले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांकडून एक प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. यात आपण आगामी काळात देखील पक्षासोबतच एकनिष्ठ राहणार असल्याचे नमूद केलेले असेल. एका अर्थाने हे निष्ठेचे प्रमाणपत्र असेल असे मानले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सदर वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आपणच ओरीजनल शिवसेना असल्याचा दावा सांगण्याची शक्यता असल्याने हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content