सिंचनासाठी मन्याडसह नार-पार प्रकल्पांला गती देवू – गुलाबराव देवकर

gulabrao devkar

उपखेड ता. चाळीसगाव । आपली जन्म व मातृभूमी असलेल्या चाळीसगाव शहर व तालुक्यातून आपणास विजयश्री खेचून आणण्यासाठी आधिक मताधिक्याची आशा आहे. आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने संधी मिळाल्यास आपण मन्याड धरणाची उंची वाढविण्या सोबतच नार-पार धरणाच्या कामाला केंद्र शासनाच्या माध्यमातून गती देवून तालूक्यासह जिल्हाभरातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न प्राधान्याने सोडवू, यासह औद्योगिक विकासाला देखिल चालना देवू, असे अश्वासन आज जळगाव लोकसभा निवडणूकीच्या प्रचारा निमित्ताने उपखेड येथिल पदाधिकारी व ग्रामस्थ बैठकीत राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी दिले. यापूर्वी गावात प्रचार करत जेष्ठ – श्रेष्ठ पदाधिकारी, ग्रामंख्यांना, युवा वर्गाशी सवांद साधत परिवर्तनाचे आवाहन केले. ग्रामंस्थ बैठकीत शहर व तालुक्याभरातून अधिक मताधिक्ये देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यानी अधिक मेहनत घ्यावी, असे आवाहन माजी आमदार राजीवदादा देशमुख यानी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच महेश मगर, माजी सरपंच प्रभाकर मगर, उपसरपंच जिभाऊ पाटील, अनिल मगर, मोतीराम पाटील, योगेश ठाकरे, वासुदेव पाटील, महेश मगर, भिकन मगर, बाळासाहेब वाघ यांच्या सह उपस्थितीत सर्व ग्रामस्थांनी परिवर्तनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सोबत पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, महानंदाचे संचालक प्रमोद बापू पाटील, जिल्हा परिषद गटनेते शशिभाऊ साळुंखे, जि.प. सदस्य भूषण पाटील डॉ.शहाजीराव देशमुख मंगेश बापू पाटील, भगवान बापू पाटील, रामचंद्र जाधव, मिलिंद जाधव, कॉग्रेसचे नेते अशोक खलाणे, अनिल निकम, योगेश पाटील यांच्यासह ईतर राष्ट्रवादी आघाडी मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content