शेगांव येथे १८ नोव्हेंबरला राहुल गांधींची विराट सभा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील फैजपूर -शेगाव येथील दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी खा. राहुल गांधी यांच्या विराट सभेची तयारी आणि नियोजनाबाबत आज बैठक दि. ३ रोजी फैजपूर येथे संपन्न झाली. यावेळी रावेर विधानसभा क्षेत्रातील रावेर-यावल तालुक्यातून जवळपास पन्नास बसेस या सभेला जाणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.

या बैठकीचे आयोजन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. भारत जोडो यात्रेनिमित्त खा.राहुल गांधी यांच्या शेगांव येथे दि १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विराट सभेनिमित्त जळगांव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते जिल्हाभर या सभेची तयारी आणि नियोजन करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे. या पार्श्वभूमीवर फैजपूर येथे आज दि ३ रोजी ही बैठक घेण्यात आली. रावेर यावल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीला मोठ्या प्रमाणावर हजेरी देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देवून शेगाव येथे होणाऱ्या खा.राहुल गांधी यांच्या शेगांव येथे दि १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विराट सभेला सुमारे पन्नास ते साठ बसेसने यावल व रावेर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार असल्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

तसेच सभा झाल्यानंतर शेगांव, भेंडवळ, जळगांव जामोद निमखेडी या गावांपर्यंत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जळगांव जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले तर आ.शिरिष चौधरी,काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीपभैय्या पाटील यांनीही मनोगत व्यक्त करतांना शेगाव येथील राहुल गांधी यांच्या विराट सभेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी बैठकीला जिल्हा सरचिटणीस जमिल शेख, ज्ञानेश्वर कोळी, यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राजीव पाटील, डॉ. जगदीश पाटील, लिलाधर चौधरी, डॉ. व्ही. आर. आर. पाटील, शेखर पाटील, नितीन चौधरी, डॉ.जी.पी.पाटील, चंद्रशेखर चौधरी, अमोल भिरुड, अजाबराव पाटील, दिलरुबाब तडवी, केतन किरंगे, मानसिंग पवार, महिला काँग्रेसच्या चंद्रकला इंगळे, प्रतिभा मोरे, कांता बोहरा, मीनाक्षी जावरे, भाग्यश्री पाठक, फैजपूर शहर काँग्रेस अध्यक्ष शेख रियाज, यावल शहर अध्यक्ष कदिर खान, फैजपूर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम तडवी, कलिम मण्यार, जावेद जनाब, गणेश गुरव, काँग्रेस आदिवासी सेल यावल तालुका अध्यक्ष बशीर तडवी, रामाराव मोरे, शेखर तायडे, सुरेश खैरनार यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रावेर यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन धनंजय शिरिष चौधरी यांनी तर आभार डॉ. जगदीश पाटील यांनी मानले.

 

Protected Content