गणेश कॉलनीतील बंद घर फोडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश कॉलनीतील विष्णूनगर पुतळा पार्क येथे सेवानिवृत्त व्यक्तीचे बंद घर फोडून घरातून १५ हजार ७५० रुपये किमतीचे भांडे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बुधवार २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ,मधुकर गणपत नेहते (वय-70, रा. विष्णू नगर पुतळा पार्क, गणेश कॉलनी, जळगाव ह. मु. पुणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून १५ हजार ७५० रुपये किंमतीचे भांडे चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मधुकर नेहते यांनी बुधवार २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे.

 

Protected Content