चिकन, मटण, माशांपेक्षा गोमांस खा ; भाजपा मंत्र्यांचा सल्ला

 

शिलॉंग : वृत्तसंस्था । एकीकडे भाजपा गोमांस खाण्यास विरोध करत असताना, मेघालय सरकारमधील मंत्री सानबोर शुलाई यांनी राज्यातील लोकांना चिकन, मटण आणि माशांपेक्षा अधिक गोमांस खा असे म्हटले आहे.

 

गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते शुलाई म्हणाले की, लोकशाही देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो.

 

“मी लोकांना चिकन, मटण किंवा माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्यास प्रोत्साहित करतो,” असे त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. लोकांना अधिक गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास भाजपा गोहत्येवर बंदी घालत आहे हा गैरसमज दूर होईल असेही ते म्हणाले. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय मंत्री शुलाई यांनीही आश्वासन दिले की ते आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्याशी बोलतील जेणेकरून मेघालयातील गुरांच्या वाहतुकीवर शेजारच्या राज्यातील गायींच्या नवीन कायद्याचा परिणाम होणार नाही.

 

आसाममध्ये ठरावीक ठिकाणांव्यतिरिक्त अन्य कुठेही गोमांस खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या भागांमध्ये गोमांस विक्री करण्यावर बंदी घालण्यात यावी ज्या ठिकाणी हिंदू, जैन, शीख समाजाचे लोक राहतात. तसेच विक्री करण्याचे ठिकाण हे कोणत्याही मंदिराच्या ५ किमीच्या परिसरात नसले पाहिजे. काही धार्मिक सणांच्या वेळी सूट दिली जाऊ शकते

 

त्याचवेळी, मेघालय आणि आसाममधील गुंतागुंतीच्या सीमा वादावर शुलाय यांनी भाष्य केलं आहे. आता राज्ये आपल्या पोलीस दलाचा वापर आपल्या सीमा आणि लोकांच्या संरक्षणासाठी करत आहे. जर आसामच्या लोकांनी सीमावर्ती भागात आमच्या लोकांना त्रास देणे सुरू ठेवले, आता फक्त बोलण्याची आणि चहा पिण्याची वेळ नाही आम्हाला उत्तर द्यावे लागेल, आम्हाला त्याचवेळी कारवाई करावी लागेल,” असे ते म्हणाले. मात्र, आपण हिंसाचाराचे समर्थक नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

“आपल्या लोकांचे रक्षण करण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण आपल्या बळाचा वापर केला पाहिजे. मिझोराम पोलिसांनी आघाडीवर जाऊन आसाम पोलिसांशी बोलले पाहिजे,” असे देखील शुलाय म्हणाले.

 

यापूर्वी कछर जिल्ह्यातील लैलापूर येथे आसाम आणि मिझोराम पोलीस दलांमध्ये रक्तरंजित चकमकी झाली होती, ज्यामध्ये आसामचे पाच पोलीस कर्मचारी आणि एक रहिवासी ठार झाले होते, तर ५० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी धोलाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content