व्हेस्पा मोपेड : मजबूत बांधा व उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । मोपेडच्या बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध असले तरी विश्‍वविख्यात व्हेस्पा कंपनीचे विविध मॉडेल्स हे ग्राहकांच्या पसंसीत उतरले आहेत. याचे विविध व्हेरियंटस् हे अतिशय मजबूत असून ते उत्तम अ‍ॅव्हरेजदेखील देतात. याच्या जोडीला अनेक सरस फिचर्सचा समावेश आहेच. याबाबत व्हेस्पाचे जळगाव शहरातील अधिकृत विक्रेते सनशाईन मोटर्सचे संचालक अमित शर्मा यांनी या मॉडेलबाबत सविस्तर माहिती दिली.

युनिबॉडी डिझाईन

जयकिसनवाडीतील सनशाईन मोटर्सचे संचालक अमित शर्मा म्हणाले की, व्हेस्पा ही जगातील सर्वात जुन्या दुचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. यामुळे या कंपनीच्या मॉडेल्समध्ये अतिशय उपयुक्त आणि अन्य कंपन्यांपासून वेगळे असे फिचर्स देण्यात आले आहेत. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे स्टीलची युनिबॉडी डिझाईन होय. अर्थात याच्या बॉडीत विविध स्पेअरपार्ट जोडण्यात आलेले नाहीत. तर यात एकाच फ्रेममध्ये दुचाकीची बॉडी दिलेली आहे. यामुळे अर्थातच या मॉडेलला अतिशय मजबुती मिळालेली आहे. अर्थात, असे असले तरी यातील इंजिन तसेच अन्य महत्वाचे भाग अतिशय सुलभ पध्दतीत उघडता येतात. काही वर्षानंतर दुचाकीतून खडखड आवाज येण्यास प्रारंभ होता. यात युनिबॉडी असल्यामुळे ही कटकट होत नाही. यातील डिकी ही हाताने काढता येते.

थ्री-व्हॉल्व्ह इंजिन

व्हेस्पा मोपेडमध्ये थ्री-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आलेले आहे. यातील दोन हे पेट्रोल सप्लायसाठी तर एक एक्झॉस्टसाठी दिलेले आहेत. यामुळे पीकअप हा चांगला येऊन याचा अ‍ॅव्हरेजही चांगला मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये एमएपी सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे अन्य मॉडेलपेक्षा याचे मायलेज उत्तम मिळते. यासोबत ७.५ लीटरची इंधन टाकी दिलेली आहे. याची डिझाईन ही मानवी शरिराला अनुकुल असे बनविण्यात आले आहे. यामुळे याला चालवल्यानंतर थकवा जाणवत नाही. यामुळे जास्त अंतर गाडी चालवूनही पाठदुखीचा त्रास होत नाही. व्हेस्पा ही युनिसेक्स अर्थात स्त्री व पुरूष या दोघांसाठी आहे. यात महिलांना जास्त वजनाचा त्रास होणार नसल्याची काळजी घेण्यात आली आहे. यातील मेन स्टँड हे अगदी सहजपणे लावता येते. यातील किकदेखील स्मूथ आहे.

अगदी रंगाचीसुध्दा वॉरंटी

व्हेस्पाच्या सर्व मॉडेल्सला सहा लेअरयुक्त पेंट देण्यात आलेला असून ही दुचाकी अतिशय आकर्षक अशा रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यांच्या शोरूममध्ये ग्राहकाला अतिरिक्त मूल्य घेऊन हव्या त्या रंगाचे मॉडेल कस्टमाईज करण्याची सुविधा दिलेली आहे. व्हेस्पा कंपनी या मॉडेलच्या पेंटची सुध्दा वॉरंटी देत असल्याची बाब लक्षणीय आहे. यात १२ इंची अलॉय व्हील दिलेले असून यामुळे गाडी चांगली पकड घेऊन धावते. तसेच यात अतिशय दर्जेदार असे शॉकअप असल्यामुळे युजरला दणके जाणवत नाही. यात किलोमीटर वायरऐवजी सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे यात गाडीचा वेग, अ‍ॅव्हरेज आदी बाबी डिजीटल प्रकारे जाणून घेता येतात.

१२५ व १५० सीसी क्षमतांचे पर्याय

खरं तर अन्य मोपेडमध्ये ३५ ते ४० इतका अ‍ॅव्हरेज मिळतो. मात्र व्हेस्पामध्ये शहरात ४५ ते ५५ तर हायवेवर तब्बल ६० इतका अ‍ॅव्हरेज मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या विविध व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य हे ६९ हजार रूपयांपासून सुरू होणारे आहे. व्हेस्पाने १२५ सीसी क्षमतेचे चार तर १५० सीसी क्षमतेचे तीन व्हेरियंट उपलब्ध केले आहेत. सनशाईनने आजवर ग्राहकांना अतिशय दर्जेदार सेवा दिली आहे. आमचे विसनजी नगरात अद्ययावत सर्व्हीस सेंटर असून येथे ग्राहकांना विक्रीपश्‍चात सेवा पुरविण्यात येत असल्याचे अमित शर्मा म्हणाले. दरम्यान, व्हेस्पाच्या या सर्व मॉडेल्सबद्दल माहिती हवी असल्यास आपण अमित शर्मा यांच्याशी सनशाईन मोटर्स जळगाव येथे संपर्क साधू शकतात.

संपर्क :

अमित शर्मा,
सनशाईन मोटर्स, पद्मालय विश्रामगृह व मेट्रो सिनेमाजवळ
जयकिसनवाडी, जळगाव
फोन : ०२५७-२२२२७७१
मोबाईल : ७५८८०५२९७४

पहा : व्हेस्पाच्या सर्व फिचर्सची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडीओ.

गुगल मॅपवर पहा सनशाईन मोटर्सचे अचूक लोकेशन

Add Comment

Protected Content