प्रहार जनशक्ती पार्टीचे विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्यापुर्वी शहरातील नाले साफसाफाई, नवीन रस्त्ते व दुरूस्तीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने सोमवारी ५ जून रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात येवून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या काही दिवसातच पावसाळा सुरू होत आहे. हवामान खात्यानुसार वादळी वाऱ्यासह पावसांची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

जळगाव शहरात रविवारी तुफान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.  असे असतांना देखील पावसाळ्यापुर्वी महापालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकरची पुर्व तयारी केली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरात नाले साफसफाई वेळेत न झाल्यामुळे शहराची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात हीच परिस्थीती राहिली तर नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापुर्वी नाले साफसफाई करून गाळ काढण्यात यावा, नवीन रस्ते आणि खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्ती करण्यात यावे, महाापालिका अपातकालीन कक्ष उभारण्यात येवून संबंधित अधिकारी यांचे नाव व मोबाईल नंबर जाहीर करावे अशी मागणी केली आहे.

 

याप्रसंगी पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख पराग कोचूरे, जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, शहराध्यक्ष प्रविण पाटील, महिला शहराध्यक्षा धारा ठक्कर, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष युसूफ खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content