बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ बसने दुचाकीला दिलेल्या धड्यात दुचाकी स्वार करून जखमी झाल्याची घटना रविवारी ४ जून रोजी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमोद रघुनाथ बोरसे (वय-३६, रा. ममुराबाद ता.जि. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रमोद बोरसे हा तरुण त्याची दुचाकी (एमएच १९ डीएन १२९४) जळगाव कडून ममुराबादकडे जात असताना रेणुका माता मंदिराजवळ बस क्रमांक (एमएच १४ बीटी  २३६३) ने कट मारून दुचाकीला धडक दिली. या धडकेत प्रमोद बोरसे हा दुचाकीवरून खाली पडला व किरकोळ जखमी झाला. या घटने प्रकरणी रात्री ११ वाजता बसवरील अज्ञात चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.

Protected Content