बांभोरी येथील आंदोलनातील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील कंपनीसमोर सुरू असलेल्या आंदोलनातील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, प्रशासनाच्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळेच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी कामगार सहकारी व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती.

शेखर गोकुळ पाटील (वय-५०) रा. खेडी कढोली ता.एरंडोल असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेखर पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून गेल्या २० ते २५ वर्षांपासून बांभोरी येथील हिताची कंपनीत कंत्राटी पध्दतीने नोकरीला होते. गेल्या २३ मे पासून त्यांच्यासह इतर कामगारांनी हिताची कंपनीसमोर प्रलंबित व विविध मागण्यांसाठी कंपनीसमोर बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. रविवारी ४ जून रोजी आंदोलनाचा तेरावा दिवस होता. या आंदोलनात शेखर पाटील हे देखील सहभागी होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी असतांना गोकुळ पाटील यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. कंपनीच्या प्रशानाच्या दबावामुळेच शेखर पाटील यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप सहकारी कामगार आणि नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत कामगारांना आणि मयताच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यावेळी जिल्हाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व कंपनीच्या कामगारांची मोठी गर्दी होती.

Protected Content